वर्धा: महाराष्ट्र राज्याला महान व्यक्तींची व संताची थोर परंपरा लाभलेली आहे. संत महात्म्यांच्या उर्जेमुळेच समाज समाजामध्ये एकोप्याचे व बंधुभावाचे वातावरण निर्मीती होण्यास फार मोठे सहकार्य असते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत श्री. जगनाडे महाराज यांनी सुध्दा महाराष्ट्राच्या या परंपरेचा वसा अविरत पणे समोर चालवला यांचे विचार व प्रेरणादायी कार्य समाजातील सर्व घटकापंर्यत पोहचविल्यास निश्चितच समाज प्रबोधनाला व मोठा हातभार लागेल असा विश्वास वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जयंती दिननिमीत्य जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे आयोजीत कार्यक्रमास व्यक्त केले.
यावर्षी प्रथमच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत असुन वर्धेसह संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. आज जिल्हाधिकारी वर्धा येथे सकाळी 11.00 वा. खासदार रामदास तडस यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन जयंतीचे उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी देखील प्रतिमेला माल्यार्पन व पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले.
खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या जिल्हाधिकारी वर्धा येथील कार्यक्रमामध्ये उपजिल्हाधिकारी श्री. मनोजकुमार खैरनार, तहसलिदार श्रीमती प्रिती डुडुलकर, ना.तह.श्रीमती शंकुतला पारासे, ना.तह.भगवान वनकर, ना. तह.श्रीमती लता गुजर, अ.का.एस.एस.मानेकर अ.का.नरेश येतकर, अ.का.पी.बी. चव्हाण, अ.का.एस.व्ही.भगत, अ.का. धनंजय वाघ, अ.का.पी.व्ही.चैधरी, अ.का. रंजना तडस, अ.का. पुनम मडावी, अ.का. संजय वलके, अ.का. राऊत, क.लिपीक जि.जि.कुलकर्णी, क.लिपीक एम.एस. जायभाये, क.लिपीक सी.एन.झाडे, क.लिपीक डी.बी.कावळे, क.लिपीक डी.बी.कांबळे, क.लिपीक एस.बी.डोईफोडे, क.लिपीक अतुल जाधव, क.लिपीक गोविंद सुरासे, क.लिपीक संतोष जाधव, नितिन मेश्राम, क.लिपीक अभय पवनारकर, क.लिपीक राजेन्द्र खरबडे, सुभाष चैधरी, क.लिपीक श्रीमती आर.बी. जयस्वाल, क.लिपीक श्रीमती विजया तळवेकर, क.लिपीक ज्योत्सना कुर्जेकर, अ.का.श्रीमती रेणूका राजपायले, तलाठी लडके, तलाठी नेवारे, शिपाई निलेश जव्हरी, किशोर अजमिरे, विजय गुडलवार उपस्थित होते.